पोस्ट्स

प्रिय सखे - ३

इमेज
बराच वेळ तिच्या उशाशी बसून होता तो. मगाशी डॉ. अक्षत गुप्ता म्हणाले ते शब्द त्याच्या कानात वाजत होते, 'शी इस इन कोमा'. त्याच्या मनाची खूप घालमेल होत होती. असे कसे काय आपण हलगर्जी पणा करू शकतो. समोरून येणार एवढा मोठा ट्रक आपल्याला दिसू नये? वीणा च्या या अवस्थेला तो सर्वस्वी स्वतःला जबाबदार धरत होता. निरनिराळ्या ठिकाणी नळ्या घुसवलेलं तिचं ते निपचित पडलेलं शरीर बघून तर त्याला अजूनच स्वतःचा राग येत होता. 'वीणा, उठ ना गं, नुसतं बघ तरी माझ्याशी, काहीतरी बोल माझ्याशी, तो एकदम आसुसल्याप्रमाणे बोलत होता. खरंतर त्यालाही खूप लागलं होतं, खूप अशक्तपणा आल्याने तोही एकदम शांत झाला. शांत बसल्यावर मागची दोन वर्ष अगदी सहजपणे त्याच्या डोळ्यासमोरून तरळत जात होती. सुमारे दोन वर्षांपूर्वीची गोष्ट होती ती. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता तो. त्याची टीम फिरोदिया करंडक ची तयारी करत होती. मागची सलग दोन वर्ष ‘द कौस्तुभ राज्याध्यक्ष’ लिखित कथानकामुळे त्याची टीम फिरोदिया मध्ये अव्वल क्रमांकावर होती. आता या कॉलेजच्या विश्र्वात स्वतःच एक वेगळं नाव निर्माण करण्याचं त्याच शेवटचं वर्ष होतं, आणि या वर्षात स...

प्रिय सखे - २

इमेज
       'आय लव्ह यू कौस्तुभ...' ती हळुवारपणे त्याच्या कानात म्हणाली, तसा तो एकदम शहारून गेला. जे ऐकण्यासाठी गेली दोन वर्षं त्याचे कान आसुसले होते, तेच ऐकत होता तो आज. हे नक्की खरंय कि स्वप्न, हे काही त्याला समजत नव्हतं. विचाराच्या भरातच त्याने एकदम स्वतःला चिमटा काढला आणि स्वतःच दचकला. ते बघून ती एकदम खळाळून हसली.      काळ्या रंगाच्या वन पीस मध्ये ती एकदमच सुरेख दिसत होती. जेमतेम गुडघ्यापर्यंत असेल तिच्या तो किंवा कदाचित त्याहूनही छोटा असेल. पण तिच्या अंगावर तो एवढा सुरेख दिसत होता. त्यातून तिने लावलेल्या लिपस्टिक ची शेड तर तीच सौंदर्य अजूनच जास्त खुलवत होती. आत्ताच जेवण केल्यामुळे तशी ती फिकट झाली होती, पण तरीही तिचे ओठ खूपच नाजूक दिसत होते. तो तिच्याकडे बघतच राहिला. अवघ्या काहीच क्षणांपूर्वी तिने त्याच्याजवळ तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे ते दोघंही एकदम खुश होते.      'आपण थोडावेळ फिरायला जाऊया?' त्याने एकदम शांततेचा भंग करत विचारलं. 'अं, खूप उशीर झालाय रे, मला घरी पण जायचंय.' ती पटकन म्हणाली. 'थोडा वेळ, अगदी थोडाच वेळ' तो एक...

प्रिय सखे - १

इमेज
     गर्द काळोख आणि धो धो पावसानी भरलेली रात्र होती ती. थंडी आणि बोचरं वारं अंगाला अगदीच त्रास देऊन जात होतं. कितीदा कूस बदलून अंगावरचं पांघरूण सारखं केलं तरीही झोप अशी काही लागतंच नव्हती. थंडीने अंग भरून आलं होतं अगदी. अशातच घडाम् ऽऽ कुठेतरी दूरवर वीज पडल्याचा आवाज आला आणि त्याचं मन धास्तावलं. का वाटत होती ही धास्ती ते काही माहित नाही पण... पण वाटत होती खरी. सारखी अनामिक हुरहूर दाटत होती. आणि तो मात्र रात्रभर कूस बदलतच राहिला…      पहाटे कधीशी झोप लागल्यामुळे सकाळी त्याला लवकर उठवलंच गेलं नाही. साडेदहाच्या दरम्यान कधीतरी तो उठला आणि धावपळीतच आवरायला निघून गेला. कारण.. कारण अकरा वाजता त्याच्या नेक्स्ट फिल्म च्या शूटिंगचा शुभारंभ होता. आणि त्याला तिथे वेळेवर पोचणं अगदीच गरजेचं होत. आपणच लिहिलेल्या आपण जीव ओतलेल्या, आपण जिवंत केलेल्या पात्रांना पडद्‌यावर साकार होताना बघणं हा एका लेखकासाठी सोहळा असतो सोहळा... घाईघाईतच त्याने आवरलं. गर्द लाल रंगाचा मखमली कुर्ता घालून तो तयार झाला. Mild smell चा perfume त्याने मारला आणि वेगातच गाडीत जाऊन बसला.    ...

राख - भस्म

जगताना जळण्यासाठी, आगी योग्य दिशा देतात काही आगी राख देतात; काही आगी भस्म देतात राख होऊन शेवटी, मातीत मिळायचं असतं भस्म लावून कपाळी, तेजाने जळायचं असतं राख हे खरंतर, कोणाच्या अंताचं प्रतीक असतं भस्म मात्र, एकाच्या अमरत्वाचं प्रतीक असतं राख होऊन सगळे, अस्ताचलाला जातात भस्म होऊन मात्र काही, अमरात्मेच जगतात राख येता हाती; आयुष्याची सरती होते भस्म येता हाती; जीवनाची विभूती होते जगताना जळण्यासाठी, आगी योग्य दिशा देतात काही आगी राख देतात; काही आगी भस्म देतात © - स्वर_अनुश्री २८/०८/२०२३

श्रीकृष्ण समजताना..

इमेज
ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने | प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: || सौराष्ट्रातील एका प्राचीन आश्वत्थ वृक्षाच्या खाली पहुडलेला तो हरी, तो परमात्मा! या भूतलावरील सर्व क्लेशांचा नाश करून सर्वत्र सुख-शांती-प्रेम-आनंद जागृत करणाऱ्या अश्या या गोविंदाला माझा नमस्कार असो. खरंतर त्या श्रीकृष्णाचं वर्णन कशा आणि कोणत्या शब्दांत करायचं हा प्रश्नच आहे. शब्दातीत आहे त्या श्रीकृष्णाचं रूप, आणि त्याचं अस्तित्व! मधुराधिपतेरखिलं मधुरम् | अश्या या श्रीकृष्णाचं सर्व काही मधुरंच आहे! तो जसा सर्वव्यापक आणि मोहक आहे त्याचप्रमाणे त्याचं नाव श्रीकृष्ण! ऐकायला अगदी गोड वाटतं, पण विचार करुन पाहिलं तर अंतर्मुख व्हायला लावतं. श्री या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातील सर्वमान्य असा अर्थ म्हणजे संपत्ती. पण त्याचबरोबर काही अर्थ असेही आहेत - श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे सामर्थ्य, श्री म्हणजे बुद्धिमत्ता, श्री म्हणजे गुणवत्ता, श्री म्हणजे अनंत, श्री म्हणजे अलौकिक! श्री या एका शब्दातून श्रीकृष्णतत्त्व लगेचच स्पष्ट होतं. प्रेम आणि सौंदर्याची परिभाषा म्हणजे श्रीकृष्ण! गुणवंत बुद्धीमंत असा राजस सुकुमार म्हणजे श्र...

श्रीकृष्ण समजताना...

इमेज
                 कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो                   लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः || मी संपूर्ण जगताचा क्षय घडवणारा काळ आहे. होय मीच काळ आहे. दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठीच मी येथे आलो आहे. असं भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणाले आहेत. हृदयाने हृदयाशी साधलेला संवाद म्हणजे हृद्गत. चराचरातील सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात निवास करणारा तो हरी, त्याच्याशी साधलेला संवाद म्हणजे हृद्गत. त्याच हृदयस्थ वासुदेवाची अनेक रूपे आहेत. त्यातूनच श्रीकृष्ण तत्त्व अधिक स्पष्ट होतं.  बालवयातच अनेक मोठ्या मोठ्या, क्रूर, दुष्ट राक्षसांचा संहार करणारा "लीलापुरुष" म्हणावा? सवंगडी व गोप एकत्र गोळा करून एकमेकांच्या खांद्यावर थर लावून, शिंकाळ्यातील दही, दुध, लोणी चोरणारा आणि तेच सर्व मित्रमंडळींमध्ये वाटून खाणारा "सात्विक नटखट चोर" म्हणावा? किशोरवयात रासक्रीडा करणारा तो "राजस सुकुमार" म्हणावा? नदीकाठी स्नानासाठी गेल्या असता गोपिकांची वस्त्रे पळवणारा "प्रणयी कुमार" म्हणावा? मानस भगिनी द्रौपदीला लज्जारक्षणास्तव...

श्रीकृष्ण समजताना..

इमेज
सद्हेतूने समष्टीच्या श्रेयसासाठी, कल्याणासाठी परमशक्तीला मनोगत आवाहन करून प्राशन केलेली जलांजली म्हणजे आचमन! शिवाजी सावंतांच्या युगंधर मध्येच वाचलंय मी हे. थोडक्यात काय तर हा लेख श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणून मी या लेखाचा शेवट करेनही. पण तरीही लेखाच्या सुरुवातीला आचमन करून श्रीकृष्णाला आवाहन करण्याचा मोह आवरला नाही इतकच. खरंतर बालबुद्धीला आणि बालमनाला बालपणापासूनच रुचतो, भावतो, आवडतो तो श्रीकृष्णच.. त्याच्या त्या मोहक, त्रासदायक तरीही मनाला भावणाऱ्या बाललीला कोणाला नाही आवडत? आपल्या बालपणीचा पहिला सवंगडी हा श्रीकृष्णच असतो नाही का? आपल्याला मोठ्यांकडून काही कथा तर आवर्जून सांगितल्या जातात.. त्याच कथा ऐकत ऐकत लहानाचे मोठे होतो नाही आपण? भर तारुण्यात आल्यावरही तो श्रीकृष्ण जवळचा वाटतो. का कुणास ठाऊक पण अगदी तारुण्यात असलेल्या मुलीच्या मनात दडलेला स्वप्नातला राजकुमार हा थेट जाऊन श्रीकृष्णाशी साधर्म्य साधतो. दूर कुठेतरी पाचूसारख्या वनांमध्ये अलगद बासरी वाजवत बसलेला तो राजस, सावळी काया असलेला श्रीकृष्ण कोणत्या मुलीच्या मनात भरणार नाही सांगा ना? मनाच्या गाभ्यावर अलगदपणे मोरपीस फिरावं तसं श्...

स्वप्न

 असाच आहेस तू,  खळखळून वाहणाऱ्या पाण्यासारखा  झुळझुळणाऱ्या नदीचा किनारा,  सळसळणाऱ्या पानांतला वारा,  धगधगणाऱ्या आगीची उब देतोस, कधी अंगावर सरसरणारा शहारा..  वाऱ्याच्या हिंदोळ्यावर झुलणारी पानं  लाल लाल गुलाबांनी बहरलेली रानं  रानाच्या त्या मधोमध उभं राहुनिया  माझ्यावर रोखलेले तुझे ते नयन  गुलाबांची लाली माझ्या गालावर चढते  तुझ्यामध्ये मी ही मग हिंदोळत जाते  मग येते एक हलकीशी झुळूक  सैरभैर होते मी ही अचानक  केस माझे उडती त्या वाऱ्यावर छान  पण ना उरते मला कशाचेच भान  नजरेत माझ्या एक तू आणि तूच दुजे काही आता या मनात भरेनाच हात तुझे पसरुनी तुही असतोस  डोळे मिटूनही मला एक तूच दिसतोस  एक एक पावलाने पुढे सरकत  मी ही मग येत जाते तुझ्याच समीप  आसुसले डोळे तुझे मला बघतात  एक एक क्षण असा जाय सरकत अचानक कसे काय कोणास ठाऊक  अंधुकले सारे काही दिसेना पुढ्यात  असतोस पण तू तसाच उभा तिथे  मी ही मग विश्वासाने चालत राहते  अवचित कशी माझी झोप मोड होते डोळ्यातले स्वप्न मग मिटुनीया जाते...

स्पर्श

ती बसून होती तशीच.. तसा बराच वेळ झाला होता. बाहेर अंधारून आलं होतं. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. क्वचितच कधीतरी एखाद्या गाडीचा हॉर्न वाजत होता. एखादी सायकलही मधून मधून जात होती. खिडकीबाहेर बघण्याची तिची इच्छा नव्हती. घरातही तिचं फारसं मन लागत नव्हतं. काय करावं तिला कळत नव्हतं. विचारात मग्न असतानाच आवेगाने तिने रेकॉर्ड चालू केली... त्या सुरांनी अवघं वातावरण भारून गेलं. खरंतर ती तिची आवडती बंदिश होती. सहज काळजाला हात घालणारी.. मनाला भिडणारी - पिया समजाऊ समझत नाही  साँस ननन्द मोरी देगी गारी पायलिया झनकार मोरी  झनन झनन बाजे झनकार  समेवर येऊन बंदिश संपली. रेकॉर्ड सुद्धा सांगकाम्याप्रमाणे थिजली. पण.. पण ती मात्र.. ती मात्र डोळ्यात जमा होऊ पाहणाऱ्या अश्रूंना प्रयत्नपूर्वक थोपवत होती. मनालाच विचारत होती - का? हे सगळे भोग माझ्याच नशिबात का? मनाचाही बांध फुटला. डोळ्यात साठलेल्या अश्रूंना वाट करून देत ती ही मोकळी होऊ लागली. रडल्याने मन मोकळं होतं असं म्हणतात. मनात साठलेल्या सगळ्या भावनांना वाट करून दिली की मन कसं हलकं होतं. छे ! खोटं आहे हे.. उलट रडल्यामुळे त्याच भावनांची पुनःपुन्ह...

अनाहत संगीत अकादमी

इमेज
नाती.. काही नाती असतातच अशी, जी अचानक जुळतात पण कायमची. एकमेकांच्या मनात असलेलं एकमेकांचं अस्तित्व, भरभरून असणारं प्रेम, ओथंबणारी माया, डोळ्यातली शीतलता, एकमेकांची काळजी यांनी ओतप्रोत भरलेली असतात अशी नाती. या नात्यांना खरंतर काहीच नाव नसतं. नाव देऊच शकत नाही मुळी.  मातापित्यानंतर ज्या नात्यांशी आपली ओळख होते.. गुरु-शिष्य, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण हीच ती नाती.. ह्या नात्यांशी ओळख झाली अनाहत संगीत अकादमी मुळे. खरंतर शाळेत होते मी तेव्हा. जराशी बुजरीच. कोणाशीच जास्त बोलायचे नाही. समोरच्या व्यक्तीशी पूर्णपणे ओळख होईपर्यंत मी गप्पच असायचे. अनाहत संगीत अकादमी मध्ये माझा प्रवेश झाला. प्रवेश प्रक्रिया झाली आणि माझा क्लासही सुरु झाला. (खरंतर इथे मला नोंद करायला अत्यंत आनंद होतोय की माझी बालपणीची मैत्रीण रक्षा पाठक हिच्या संपर्कामुळे आणि सहकार्यामुळेच माझा प्रवेश होऊ शकला.) संस्कृत मध्ये तात या शब्दाचा अर्थ वडील असा आहे. आमचे नावाने व अधिकाराने तात म्हणजे आमचे गुरुजी. अकादमी मध्ये गुरूंना म्हणजेच डॉ. रवींद्र घांगुर्डे गुरुजी यांना तात व डॉ. वंदना घांगुर्डे मॅडम यांना दीदी म्हणतात आणि तेही आप...