स्त्री
#latepost #nirbhaya #soudamini #asifa मुलगी म्हणजे धनाची पेटी.. म्हणायला खूप सोपंय पण आजच्या जगात याच लक्ष्मीला पायपुसणीसारखं वागवलं जातंय. आजच्या जगात वावरताना मृत्यूच्या भीतीपेक्षाही लोकांच्या नजरांची भीती वाटते. त्या नजरा सहन करण्यापेक्षा मृत्यू सोपा वाटतो. जवळचा वाटतो. खूपच उद्धटपणाचं आणि तडकाफडकी केलेलं वक्तव्य असेलही हे, अविचारी ही असेल पण तितकंच सत्य आहे. अगदी २१-२२ वर्षाच्या मुलीपासून ते प्रौढ वयाच्या बाईपर्यंत कोणती स्त्री सुरक्षित आहे? खरंतर आता ५-६ वर्षाच्या मुलींची ही खूप काळजी वाटू लागली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे अनन्यसाधारण कर्तृत्व आहे. शुंभनिशुंभादिक राक्षसांचा नायनाट करणारी एक स्त्री होती. आपल्या पतीच्या कल्याणासाठी, सहवासासाठी सर्व भौतिक सुखांचा त्याग करून चौदा वर्ष वनवास भोगणारी एक स्त्री होती. कठोर अग्निपरीक्षेला सामोरी जाऊन त्यात सरस ठरणारी एक स्त्री होती. आपल्या पोटच्या बाळाला कमरेशी बांधून रणांगणावर उतरणारी एक स्त्री होती. राष्ट्रपती पदाची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे पेलणारी एक स्त्री आहे. क्रिकेट, बॉक्सिंग सारख्या खेळात प्राविण्य मिळवणारी स्त्र...