पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नजर

एकवीसाव्या शतकात राहतो आपण.. या दरम्यान कितीतरी बदल झाले खरे.. दूरसंचरण पद्धती, अणुविद्युत शक्ती, क्षेपणास्त्र, गुप्तचर यंत्रणा, सर्व सोयीनी सुसज्ज असे मोठे मोठे मॉल्स, आणि बरंच काही.. पण एवढ्या प्रगती नंतर ही एक गोष्ट मात्र बदलू शकली नाही.. ती म्हणजे नजर..  आजच्या काळात सर्वच क्षेत्रात आपली असामान्य कर्तबगारी दाखवून स्वतःला सिद्ध करणाऱ्या मुली जन्माला येतात. पण तरीही कुठेतरी गालबोट लागतंच नाही का? बऱ्याचदा त्याच स्त्रियांवर रोखली जाणारी नजर ही कौतुकाची, प्रेमाची नसून किळसवाणी व लांछनास्पद असते. (अर्थातच काही अपवाद वगळता..) बस, मॉल्स, हॉटेल्स, शाळा-कॉलेज, कामाच्या ठिकाणी यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी देखील बऱ्याचदा अशा नजरांना सामोरं जावं लागतं. एखाद्या व्यक्तीवर अनावश्यक पणे रोखल्या जाणाऱ्या व तिच्यावर खिळून राहणाऱ्या नजरेमुळे (ज्याला सामान्य भाषेत staring असं म्हणतात) त्या व्यक्तीला होणाऱ्या त्रासाची कल्पना करणं ही अशक्य आहे.. आणि खरंतर आजकाल याचे अनेक प्रकार चाललेले दिसून येतात.. staring, Stalking, Digital stalking यांसारखे अनेक प्रकार सर्रास घडून येताना दिसतात.. अख्खं चक्रच बदलतं...