पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राख - भस्म

जगताना जळण्यासाठी, आगी योग्य दिशा देतात काही आगी राख देतात; काही आगी भस्म देतात राख होऊन शेवटी, मातीत मिळायचं असतं भस्म लावून कपाळी, तेजाने जळायचं असतं राख हे खरंतर, कोणाच्या अंताचं प्रतीक असतं भस्म मात्र, एकाच्या अमरत्वाचं प्रतीक असतं राख होऊन सगळे, अस्ताचलाला जातात भस्म होऊन मात्र काही, अमरात्मेच जगतात राख येता हाती; आयुष्याची सरती होते भस्म येता हाती; जीवनाची विभूती होते जगताना जळण्यासाठी, आगी योग्य दिशा देतात काही आगी राख देतात; काही आगी भस्म देतात © - स्वर_अनुश्री २८/०८/२०२३