श्रीकृष्ण समजताना...
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः || मी संपूर्ण जगताचा क्षय घडवणारा काळ आहे. होय मीच काळ आहे. दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठीच मी येथे आलो आहे. असं भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणाले आहेत. हृदयाने हृदयाशी साधलेला संवाद म्हणजे हृद्गत. चराचरातील सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात निवास करणारा तो हरी, त्याच्याशी साधलेला संवाद म्हणजे हृद्गत. त्याच हृदयस्थ वासुदेवाची अनेक रूपे आहेत. त्यातूनच श्रीकृष्ण तत्त्व अधिक स्पष्ट होतं. बालवयातच अनेक मोठ्या मोठ्या, क्रूर, दुष्ट राक्षसांचा संहार करणारा "लीलापुरुष" म्हणावा? सवंगडी व गोप एकत्र गोळा करून एकमेकांच्या खांद्यावर थर लावून, शिंकाळ्यातील दही, दुध, लोणी चोरणारा आणि तेच सर्व मित्रमंडळींमध्ये वाटून खाणारा "सात्विक नटखट चोर" म्हणावा? किशोरवयात रासक्रीडा करणारा तो "राजस सुकुमार" म्हणावा? नदीकाठी स्नानासाठी गेल्या असता गोपिकांची वस्त्रे पळवणारा "प्रणयी कुमार" म्हणावा? मानस भगिनी द्रौपदीला लज्जारक्षणास्तव...