सख्या रे
श्रावणाच्या धुंद मासी
डोळ्यामधुनी प्रीत तरारे
हिरव्या हिरव्या मखमलीत मी
वाट पाहते तुझी सख्या रे
शब्द बोलके आज संपले
मुक्या भावना दाटून येता
तुझी प्रेमिका कशी आज का
धुंद पाहते तुला सख्या रे
शब्द संपता सूर दाटले
मनातले का ओठी आले
मायेच्या ह्या प्रेमसागरी
मुक्त नाहते मी सख्या रे
दिसामागूनी रात उगवते
परी तुझी का साद न येते
मूकपणाने दुःख सागरी
प्रीत वाहते आज सख्या रे
तुझ्या भेटीची आस लागली
व्याकुळता का मनी दाटली
परी तुला ना ओढ तयाची
तरी गुंतते मी च सख्या रे
शब्द थांबले भाव संपले
एकटीच मी आज राहिले
अखेरचा हा श्वास माझा
तरी शोधतो तुला सख्या रे
© स्वर_अनुश्री
Khup chan😘
उत्तर द्याहटवाAwesomeeeee😍😍😘😘😘
उत्तर द्याहटवाChhaan e😊
उत्तर द्याहटवा