अंतरीचे गूज

स्वप्न पाहता आज नव्याने
धुंद सुमने उमलून आली
बावरलेल्या भेदरलेल्या
शहारल्या मना तू मार भरारी

मंद चांदणे मूक आसवे
सुखदुःखाची गीते
वारा गातो आज नव्याने
मना तुझीच गीते

मना आज का तुझ्या भावना
शब्दबद्ध झाल्या
तुझ्या जगातील कवीतत्त्वाच्या
कविता जन्मा आल्या

मावळतीच्या दिशा रंगल्या
अबोल सायंकाळी
पूर्व दिशेची छटा परी का
मना तुझ्याच गाली

रात येता अंधार होता
दीप आज थिजले
अंतरीचे गूज माझ्या
मना तुलाच कळले

© स्वर_अनुश्री

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रिय सखे - ३

प्रिय सखे - २

प्रिय सखे - १