तिची अधुरी कहाणी..
त्याला कळतंच नव्हतं..ती त्याच्यात किती गुंतत होती..त्याच्यापासून लांब जाताना..कुठेतरी आणखी जवळ येत होती..त्याच्याच नकळत त्यालाच पाहताना स्वतःच्या नकळत स्वतःला हरवून बसत होती..एखाद्या गोष्टीत मग्न असणा-या त्याचा चेहेरा निरखताना लाजून चूर होत होती..त्याच्या चेहे-यावरील आनंद मिश्रित अनिमिष भाव पाहून सुखावत होती..तिच्या सुखाला दृष्ट लावणारा दिवस उगवलाच..आज तो खूपच सुंदर दिसत होता..तिला शब्द अनिवार झाले.. मनातल्या भावना ओठांवर येण्याची चिन्हे दिसू लागली..त्याने त्याच्या बरोबर च्या त्या व्यक्तीशी तिची ओळख करून दिली..तिच्या काळजाचा ठोकाच चुकला..डोळ्यात येणारे अश्रू प्रयत्नपूर्वक हास्यात वळते करून तिने त्याला शुभेच्छा दिल्या..
आज त्याचे लग्न झाले आहे..ती मात्र डोळ्यात प्राण आणून त्याचा चेहेरा आठवत रहाते..त्याला कधीच कळलं नाही...ती त्याच्यात किती गुंतली होती...
तिच्यासाठी झालेला देवदास सर्वांना माहिती आहे..पण आज..त्याच्यासाठी थांबालेल्या तिला पाहताना मन भरून येतं...नकळत का होईना..त्याने तिला दुखावलं होतं..प्रीतीचा वसंत बहरण्याआधिच सरला होता..तरी तिच्या मनातील भावना जिवंत होत्या..ती दिवसरात्र झुरत होती..त्याच्यासाठी..दुपारच्या प्रखर उन्हात त्याची आठवण तिला सावली देत होती..सायंकाळची अबोल छटा आणि त्याचा अबोलपणा कुणास ठाऊक सारखाच वाटत होता..सतत हसरी,आनंदी असणारी ती..कोमेजून गेली होती..त्याच्याच आठवणीत..
दरम्यान 5 वर्षे झाली..
अचानक फोन खणखणला.. हॅलो, कोण बोलतंय? - जुजबी विचारणा..
मी - तेवढंच जुजबी उत्तर..
तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले.. तोच आवाज..तोच सुर..कानांवर विश्वासच बसेना..तेवढ्या एकाच क्षणात ती 5 वर्षं मागे गेली..कोण बोलतंय या प्रश्नावर मी एवढं जुजबी उत्तरच मिळायचं..त्यावरून आपलं आपणच समजून घ्यायचं..खरंतर तो अबोलच होता..मोजक्याच पण निटनेटक्या शब्दात बोलणारा.. पण बोलताना त्याची नजर मात्र समोरच्याच्या काळजाचा ठाव घ्यायची.. त्याच्या वेधक आणि सूचक बोलण्यामुळे समोरचा निरूत्तर व्हायचा.. आणि मोहितही...
त्याचे डोळे विशेष बोलके होते..समोरच्याशी संवाद साधणारे..समोरच्याला बोलतं ठेवणारे..त्याच्या स्वभावाच्या अगदी विरूद्ध... बोलताना मानेला दिला जाणारा झटका.. त्याचे हातवारे..त्याचं हसणं..सगळं सगळंच तिच्या मनात भरत होतं..
हॅलो...समोरून पुन्हा विचारणा झाली आणि ती भानावर आली..
तु..? - आश्चर्य आनंद प्रेम उत्साह अविश्वास यांसारख्या अनेक भावनामिश्रीत आवाजात तिने विचारलं..
हो मी च.. - पुन्हा जुजबी च उत्तर
खरंतर खूप खूप बोलायचं होतं..बेसूमार..5 वर्षांत जे बोलायचं राहिलं होतं ते सगळं सगळं बोलायचं होतं..नकळत दुखावल्या गेलेल्या मनाचा नकळत जाब विचारायचा होता..पण... वरवर च्या गप्पा मारून तिने फोन ठेवला..
ती पूर्णपणे भूतकाळात हरवली होती..
त्याच्याशी मारलेल्या गप्पा..वेळकाळाचं बंधन तोडून एकमेकांना केलेले फोन्स.. एकमेकांशी शेअर केलेल्या गोष्टी..एकमेकांना केलेली मदत..इथपर्यंत सगळं दुतर्फा होतं..
पण त्याच्यावर केलेलं प्रेम.. पचवलेला हार्ट ब्रेक.. सततचं दुःख..त्याच्यासाठी झुरणं.. यात मात्र त्याची साथ नव्हती.. सगळं सगळं एकतर्फी..
ती खूपच खचली होती..पण तरी खंबीरपणे उभी होती..त्याच्या फक्त आठवणी मुळे..जगाच्या पाठीवर तो जिथे कुठे असेल, सुखातच असेल या विश्वासावर..त्याने सुखात राहावे एवढी एकच अपेक्षा होती आता तिची..पाच वर्षे त्याच्या आठवणीत काढली होती..आणि आज अचानक त्याचा फोन..अनपेक्षित पणे अपेक्षित गोष्ट घडली होती..तिचं मन पुन्हा त्याच्याकडे ओढ घेऊ लागलं..मनाने पुन्हा भरारी घेतली..
भूतकाळात आणि त्याच्या आठवणीत आठवडा गेला.. खरंतर ह्या आठवड्यात तिला तो सोडून काहीच सुचलं नव्हतं..सतत त्याचेच विचार डोक्यात..तरल आठवड्यात प्रत्येक दिवशी त्याला भेटायची तिला ब-याचदा इच्छा झाली..आज तिने त्याला भेटायचं अस ठरवलं..त्या दिवशी फोन वर तिने त्याचा अॅड्रेस घेतला होता..ती निघाली..
घरात तो दिसत नव्हता..त्याची बायको होती..
ये तो म्हणालाच होता तु येशील..
.......
त्याची बायको बोलत होती..ती ऐकत होती..थक्क होऊन..
त्याला.......
ब्रेन कॅन्सर.....
तिच्या काळजात चर्र झालं..डोळ्यात अश्रु जभा झाले..
ज्या दिवशी त्याने तुला फोन केला होता, त्याच दिवशी संध्याकाळी तो हे जग सोडून गेला..तो नेहमी म्हणायचा..त्याने तुला दुखावलंय आणि तो त्याचं गिल्ट घेऊनच जगत होता..तुझ्याएवढं प्रेम मी ही नाही करू शकले त्याच्यावर...
......
जाताना त्याने पत्र दिलंय तुझ्यासाठी..हे घे..
निरोप घेऊन ती निघाली..
घरी येऊन अधिरतेने तिने पत्र उघडलं..
प्रिय...
मी तुला खूप दुखावलंय..नकळत नाही..कळतच..मला कळत होतं मी काय करतोय..पण....
तुला जास्त त्रास नको म्हणून मी तुझ्या पासून लांब निघून गेलो..पण तुला दुखावल्याचा गिल्ट होता मनात..म्हणून हे पत्र..
हे तुला मिळेल तेव्हा मी ह्या जगात नसेन..पण तु स्वतःची काळजी घे.. आणि आनंदी रहा..
-तुझाच
रडतारडताच तिची कहाणी संपली..तरीही अधुरीच राहिली...
© स्वर_अनुश्री
Lovely 😍❤️
उत्तर द्याहटवाहृदयस्पर्शी कहाणी 😃😃😃well done
उत्तर द्याहटवा