अनाहत

तुला पाहता आज असा
मनातील का भाव कळे
ओठावरल्या गीताला का
आज नव्याने चाल मीळे

गतजन्मीचे आपुले नाते
ओढ त्याची आज कळे
ओठावरल्या गीताला का
आज नव्याने चाल मीळे

दुःखसुखाचा खेळ खेळता
विरही प्रीत का आज जळे
ओठावरल्या गीताला का
आज नव्याने चाल मीळे

तुझीच गाणी गाण्यासाठी
अनाहत हा सुर जुळे
ओठावरल्या गीताला का
आज नव्याने चाल मीळे

© स्वर_अनुश्री

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रिय सखे - ३

प्रिय सखे - २

प्रिय सखे - १