स्वप्ननगरी
काॅलेज लाईफ.. प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारा काळ..नवीन काॅलेज, नवीन वातावरण, नवीन आयुष्य, नवीन मित्र, आणि प्रत्येकाच्या डोळ्यांत नवीन आशा..नवीन विश्वास..
पहिलं लेक्चर, पहिलं सबमिशन, पहिली मूव्ही, पहिला बंक, पहिलं प्रेम आणि पहिला हार्टब्रेक सगळं सगळं काही या काॅलेज लाईफ मध्येच घडतं..
सगळं विसरून माणसाला धुंद व्हायला शिकवते काॅलेज लाईफ...आलेल्या प्रत्येक संकटांना धिराने सामोरं जायला शिकवते काॅलेज लाईफ...निःस्वार्थ प्रेम करायला शिकवते काॅलेज लाईफ...आणि रडूनही पुन्हा सावरायला शिकवते काॅलेज लाईफ...
सुरुवातीला खरंतर सगळंच अनोळखी असतं..तरीही हवंहवंस..खूप आतुरता असते शाळा संपवून काॅलेजला जायची...मनावर खरंतर दडपण आलेलं असतं.. नवीन वातावरण, अनोळखी ठिकाण, अनोळखी माणसं यात आपलं असं अस्तित्व निर्माण करायचं असतं..आपली ओळख तयार करायची असते..नवीन मित्रमैत्रिणी जोडायचे असतात..ओळखी वाढवायच्या असतात..काॅलेजच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाला दडपण आलेलंच असतं.. का कुणास ठाऊक?
ओळख होते..पहिला आठवडा तर अगदी स्वप्नासारखा निघून जातो..भूर्रकन..हळूहळू सवय होत असते..सगळयाचीच..पहिल्या महिन्यात किमान एवढं तरी नक्की कळतं की काॅलेज ही स्वप्नांची नगरी असते..तिथे आलेल्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं..आशा असते..ते पूर्ण करण्यासाठी ची धडपड असते..वाटलेलं त्यापेक्षा ही काहीतरी अद्भूत असतं का काॅलेज..?
हळूहळू मित्रमैत्रिणी होतात, ओळखी होतात, एकमेकांचे स्वभाव कळतात...मैत्रीचे धागे घट्ट होतात आणि इथूनच सुरू होते खरी काॅलेज लाईफ...एखादा घट्ट ग्रुप बनून जातो..कधीच न तुटण्यासाठी..
स्वप्न ऐन रंगात येतं आणि कळतं..हे खरंच खूप काहीतरी वेगळं आहे..शाळेसारखं इथे वातावरण सेफ नसतं..माणसं ओळखायला शिकतो ते काॅलेज लाईफ मध्येच..खरे मित्र आणि दिखाऊपणा दोन्हीची ओळख इथेच होते..दुखावलं जातं कुठेतरी..
त्यातून सावरता सावरता अचानक काहीतरी घडतं.. कोणीतरी आवडून जातं..सगळं अचानक बदलून जातं..प्रेम म्हणजे काय हे नीटसं कळतही नसतं..आणि कळतं तेव्हा आपण प्रेमात पूर्णपणे बुडालेलो असतो..पण बहुधा त्या व्यक्तीला कळतंच नाहीत भावना..पहिलाच अनुभव..खूप वेगळा..हार्ट ब्रेक चा धक्का..खोलवर जखम होते..खूप खूप ताण येतो मनावर..
एवढं होत असताना अचानक परीक्षा येतात..वातावरण पुन्हा बदलतं..सगळे सगळं विसरून पुन्हा एकत्र येतात..कशीबशी परीक्षा पार पडते..पुन्हा पहिले पाढे पंचावन्न..तु तु..मी मी..कुठेतरी आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो..
रिझल्ट लागतो..प्रत्येकाने डोळ्यात जपलेलं स्वप्न पुर्ण होताना दिसतं.. काॅलेज सुटतं पण आठवणी ताज्या राहतात..प्रत्येकाच्या आयुष्यात काॅलेज लाईफ हा टर्निंग पाॅईंट असतो.. ख-याखोट्याची दुनिया पण एकदम स्वप्नवत.. गुलाबी...स्वप्ननगरी....
© स्वर_अनुश्री
Clg life 😍
उत्तर द्याहटवाVery nice ....
उत्तर द्याहटवाAnd ys clg life -turning point ..
ह्यातुन काय शिकाता येत ते बघा .