ज्वाला...
जशी जशी सूर्यास्ताची वेळ येत होती तशी तशी त्याची हुरहूर वाढत होती. नाही म्हणलं तरी दोन वर्षे उलटून गेली होती त्या घटनेला. तरी त्याच्या डोळ्या समोर सगळं स्पष्ट दिसत होतं. तिन्हीसांजेच्या अंधारातही अगदी लख्ख! तिच्या पायातील घुंगरांचा नाद देखील अगदी स्पष्ट ऐकू येत होता त्याला. नकळतच तो पुन्हा त्या (नकोशा?) आठवणीत रमला...
तिच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस होता तो. कथक नृत्यात पदवी प्राप्त केल्यानंतर तिचा पहिला स्वतंत्र कार्यक्रम. सगळी जय्यत तयारी झाली. ठरलेल्या वेळी कार्यक्रम सुरु ही झाला. थोडी धकधक होती तिला. नर्वसनेस म्हणतात ना तो ही होता. पण का कुणास ठाऊक एक वेगळीच हुरहूर लागून राहिली होती...कसली तरी अनामिक भीती..पण.. पण कसली?? मनातले विचार मनातच ठेवून ती स्टेज वर आली. तिच्या घुंगरांच्या नादाने सर्वजण भारावून गेले. तो ही !!
भर रंगात आलेला कार्यक्रम...धडाsssssssssssम अचानक कसला तरी आवाज झाला..काय झालंय हे लोकांना कळायच्या आतच त्या भयानक केशरी ज्वालांनी त्या सभागृहाचा ताबा घेतला... लोक जिवाच्या आकांताने पळू लागले.. शॉर्ट सर्किट झाले.. बऱ्याच लोकांच्या जीवावर बेतले.. काही लोकांनी जीव गमावले.. या सगळ्या गादारोळात तो तिला वाचवायचा प्रयत्न करत होता... पण ती....
ती दिसेना.. फक्त दिसत होत्या त्या तप्त केशरी ज्वाला.. तिला दडवू पाहणाऱ्या.. गिळू पाहणाऱ्या.. त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले. सूर्य अस्ताला गेला होता..बाहेर पूर्ण अंधार पडला होता..त्याच्या मनात मात्र ज्वाला भडकू लागल्या होत्या. ज्वाला भडकू लागल्या होत्या.. ज्वाला भडकू लागल्या होत्या...
© स्वर_अनुश्री
Liked your arrangement, exactness, depth and connectivity ✌🏼
उत्तर द्याहटवाWell done
Keep it up
Awesome..... Nicely depected .
उत्तर द्याहटवा😊😊👍👍👌👌keep it up