स्त्री

#latepost #nirbhaya #soudamini #asifa

मुलगी म्हणजे धनाची पेटी.. म्हणायला खूप सोपंय पण आजच्या जगात याच लक्ष्मीला पायपुसणीसारखं वागवलं जातंय. आजच्या जगात वावरताना मृत्यूच्या भीतीपेक्षाही लोकांच्या नजरांची भीती वाटते. त्या नजरा सहन करण्यापेक्षा मृत्यू सोपा वाटतो. जवळचा वाटतो. खूपच उद्धटपणाचं आणि तडकाफडकी केलेलं वक्तव्य असेलही हे, अविचारी ही असेल पण तितकंच सत्य आहे. 

अगदी २१-२२ वर्षाच्या मुलीपासून ते प्रौढ वयाच्या बाईपर्यंत कोणती स्त्री सुरक्षित आहे? खरंतर आता ५-६ वर्षाच्या मुलींची ही खूप काळजी वाटू लागली आहे. 

भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे अनन्यसाधारण कर्तृत्व आहे. शुंभनिशुंभादिक राक्षसांचा नायनाट करणारी एक स्त्री होती. आपल्या पतीच्या कल्याणासाठी, सहवासासाठी सर्व भौतिक सुखांचा त्याग करून चौदा वर्ष वनवास भोगणारी एक स्त्री होती. कठोर अग्निपरीक्षेला सामोरी जाऊन त्यात सरस ठरणारी एक स्त्री होती. आपल्या पोटच्या बाळाला कमरेशी बांधून रणांगणावर उतरणारी एक स्त्री होती. राष्ट्रपती पदाची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे पेलणारी एक स्त्री आहे. क्रिकेट, बॉक्सिंग सारख्या खेळात प्राविण्य मिळवणारी स्त्री आहे. गायन, वादन, नृत्य या कलात्मक क्षेत्रात स्त्रियांची आघाडी आहे. त्याच स्त्री ची आज अवहेलना चालु आहे.. अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार बेसूमार वाढले आहेत. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अश्या प्रकारची अमानुष कृत्य घडून येण्याइतपत लांछनास्पद परिस्थिती आज यावी?? "परस्त्री मातेसमान" या तथाकथित उक्तीची ही सर्रास होणारी अवहेलना अजून किती वर्ष?? 

२०२० मध्ये पदार्पण तर केलंय. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सरांचं स्वप्न होतं २०२० मध्ये भारताला महासत्ता बनवायचं. त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणं सोडून ह्या अमानुष कृत्त्यांची वाढ होतीये. 

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं.. भारतीय नारी ला स्वातंत्र्य कधी मिळणार? उत्तर द्या !!!!


© स्वर_अनुश्री 

टिप्पण्या

  1. खूप छान लिहिलंयस अनु. परस्त्री प्रत्येवेळी मातेसमानच मानली पाहिजे असं नाही परंतू बहीण अथवा मैत्रिण अन्यथा पत्नी समान मानली तरीदेखील खूप काही होईल असं मला वाटतं.प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रयत्न केले तरच हे शक्य आहे, मी माझ्या परीने सुरुवात केलीय.

    उत्तर द्याहटवा
  2. A very genuine thought anushree and very brave decision to put how you feel about you surrounding.
    Kudos n keep posting.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रिय सखे - ३

प्रिय सखे - २

प्रिय सखे - १