एकाकी
गुलाबी थंडी बोचरा वारा
अस्वस्थ तनुवर येई शहारा
तुझी आठवण अवचित येते
मनात माझ्या काहूर उठते
आठवूनी मी आपुल्या गाठी
नकळत घडल्या गोड भेटी
क्वचित कधीश्या चुकल्या होत्या
परी मनी मी जपल्या होत्या
भरून राहिले अंतरात ते
तुझे मोहक बोल बोलणे
सवय कधीशी होऊन गेली
कठीण वाटते तुला विसरणे
स्मरते मी तुला आजही
नयनी माझ्या ओल पुसूनी
नको वाटते दुदर्शा ही
परी अंतरी तूच अजुनी
आज फिरुनी तुला पाहते
तुझ्याकडे मी तुला मागते
माझ्यामधल्या तुला शोधता
पुन्हा पुन्हा मी गुंतत जाते
येशील का तु कधी परतूनी
अंतरी आशा पेटते मुकी
काव्य संपता जाणीव होते
अन मला कळते मी एकाकी
© स्वर_अनुश्री
सुरेख वर्णन 💕❣️ सुंदर विचार 🌼🌼
उत्तर द्याहटवाअप्रतिम 😍😍😍
उत्तर द्याहटवाअप्रतिम कल्पनाशक्ती ☺️☺️❣️👍
उत्तर द्याहटवा♥️ lovely
उत्तर द्याहटवाअप्रतिम लिहिलंस ग अनुश्री. अशीच लिहीत राहा.
उत्तर द्याहटवाखूप छान.😍👌 Keep it up.
उत्तर द्याहटवाMast 👌☺️
उत्तर द्याहटवा