पुनर्जन्म - १

"नाही! नाही!" हे काय चाललंय तिचं तिलाही कळत नव्हतं. काहीतरी आकस्मित, अकल्पित घडत होतं. अपरिचित घटना, अपरिचित व्यक्ति, अपरिचित ठिकाणे का कुणास ठाऊक, पण परिचित वाटत होती. आयुष्यात पहिल्यांदाच बघत असलेल्या महादेवाच्या मंदिरातील नंदी, समोर उभी असताना मंदिराच्या मागून वाहणार्‍या नदीचा खळखळाट तिला परिचित वाटत होता. या मंदिराच्या कोपऱ्या कोपऱ्यातून आपल्याला काहीतरी खुणावतय. या मंदिरात काहीतरी गूढ दडलंय. आपला त्याच्याशी कसला संबंध असेल? असा विचार करत असतानाच अचानक सुरू झालेल्या घंटानादामुळे ती दचकली. 

"घण घण घण घण" अशा मोठ्या आवाजात होणाऱ्या घंटा नादामुळे या भागातील शांतता क्षणाक्षणाला भंग पावत होती. अचानक सोसाट्याचा वारा सुटला त्यासरशी तिथल्या झाडांची पाने गळून पडली. आकाश एकदम निरभ्र असताना अचानक एक काळा ढग दिसावा आणि काही क्षणात ते निरभ्र आकाश काळवंडले जाऊन धोधो पाऊस पडावा तसं काहीसं त्या परिसराचं झालं. अतिशय शांत असणाऱ्या त्या परिसरात अचानक घंटानाद सुरू झाला, सोसाट्याचा वारा आला आणि  चक्रच पालटलं.

कसला संकेत असेल तो? काहीतरी अघटित घडणार हे मात्र नक्की! पण नक्की काय सूं सुं करत वाहणाऱ्या वार्‍याबरोबर पानांची सळसळ आणि जोडीला अगदी मोठा व भयंकर घंटानाद. सर्वत्र एकदम भयाण वातावरण याद्वारे नक्की काहीतरी संकेत मिळत आहेत. पण काय? त्याच्याशी आपला काय संबंध?

"अस्मि!" एकदम हाक ऐकू आली. आजूबाजूचे वातावरण आता निवळले होते. फक्त अवशेषच उरले होते. जमिनीवर सगळीकडे झाडांची वाळलेली पाने पडली होती. ती सर कोसळल्यावर पुन्हा क्षणात आकाश कसं निरभ्र होतं. अगदी तसं. "अस्मि" आधीपेक्षा जरा मोठ्या पण मृदू आवाजात हाक आली तशी ती भानावर आली इकडे तिकडे बघतो तोच तिला समोर परिचित चेहरा दिसला. 

"मृण्मयी..." एकदम आठवल्यासारखं अस्मि म्हणाली.
"अगं, अगं आम्ही  तुला कुठे कुठे शोधतोय? आणि तू इथे आहेस!" मृण्मयी कपाळावर हात मारून म्हणाली.
"खरंतर मलाही कळत नाहीये मी इथे कशी..? का..? कधी..?" अस्मिचा गोंधळलेला चेहरा पाहून मृण्मयी म्हणाली -"महाराणी आपण येथे वादळ सुरू होण्यापूर्वी आला होतात." "वादळ?" अस्मिचा चेहरा आणखी प्रश्नार्थक झाला पण तिच्याकडे लक्ष न देता मृण्मयी म्हणाली, "वादळाची शक्यता खूपच आहे. मला वाटतं आपण मुंबईला निघू तेच जास्त सुरक्षित असेल. सानिका, रेश्मा, मिहीर, अक्षय, मिथिल तुला वेड्यासारखे शोधतायत.. चल निघूयात आपण.."

खरंतर मृण्मयीच्या बोलण्याकडे अस्मिचं लक्षच नव्हत पण तिच्या "निघूयात आपण" ने अस्मि भानावर आली. खरंतर तिला जायचं नव्हतं. इथेच राहायचं होतं. आणखी काही दिवस. गुपित सुटेपर्यंत. कोडं उलगडे पर्यंत. त्या मंदिराचा असं काय गूढ आहे(?), ते आपल्याला काय खुणावतंय? याचा शोध लागेपर्यंत. पण आत्ता नाइलाजाने ती निघाली. पण... पुन्हा इथे येऊन त्या गुपिताचा उलगडा करणार नक्कीच ...
या निश्चयावर... 
गूढ (दृढ) निश्चयावर...

© स्वर_अनुश्री

(छायाचित्र - गूगल)

टिप्पण्या

  1. Wow, u are here with a horror one n that's pretty interesting. Ua skills are amazing. Waiting for the next part of it...

    उत्तर द्याहटवा
  2. It's really fantastic, mindblowing imagination strength....
    Waiting for the next part....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रिय सखे - ३

प्रिय सखे - २

प्रिय सखे - १