पुनर्जन्म - ३
पोहोचताच सर्वप्रथम त्या महादेवाच्या मंदिरात सर्वजण गेले. त्या मंदिराविषयी आजूबाजूला चौकशी केल्यावर कळलं ते सर्वात जुने, पौराणिक मंदिर आहे आणि सुमारे पन्नास वर्षांपूर्वी या गावातील पुजाऱ्याचा रहस्यमय मृत्यू झाला. सर्वांच्या डोक्यात खाडकन ट्यूब पेटली.
पुजाऱ्याचे प्रेत....
त्या पुजार्याला एक मुलगी होती. पण ती मुलगीही खूप वर्षांपासून बेपत्ता आहे. खाडकन दुसरी ट्यूब पेटली.
खिडकीत बसून रडणारी मुलगी - रिकामी खिडकी......
गावकऱ्यांना धन्यवाद करून सप्तर्षी एका शांत ठिकाणी आली.
खिडकीत बसून रडणारी मुलगी, रिकामी खिडकी, पुजाऱ्याचे प्रेत, महादेवाचे मंदिर यांचा संबंध लागला. पण, पण तो पडका वाडा? आणि या सर्वांचा अस्मिशी काय संबंध?
"Guys I think आपण त्या वाड्यातच जाऊ मगच कळेल!" असं म्हणून अस्मि वेशीवरच्या पडक्या वाड्याच्या दिशेने निघाली.
त्या वाड्याच्या भोवती अनेक झाडं होती. त्या वाड्याची आणि त्या झाडांची काळजी घेतली असती तर कदाचित ती खूप सुंदर वास्तू ठरली असती. अचानक अस्मि ओरडली - "बघा, बघा ती रडतेय!" सर्वजण अचंबित होऊन अस्मिकडे बघू लागले. धावत, पळत अडखळतच अस्मि माडीवर आली. एकदम स्तब्ध, शांत, व्याकूळ नजरेने इकडे तिकडे बघत उभी होती. अचानक अस्मि रडायला लागली. होय, तीच खिडकी आणि रडण्याचा आवाज-
अस्मिच्या रडण्याचा.....
खूप वेळ रडून झाल्यावर रडणं आवरतं घेत ती म्हणाली - "मोहिनी, मोहिनी रामचंद्र सातवडे." या गावातील महादेवाच्या मंदिराचे पुजारी रामचंद्र सातवडे यांची मुलगी. वडील पुजारी. घरची परिस्थिती यथातथा: पण कष्ट करून मोहिनीला शिकविण्याची त्यांची इच्छा होती. मोहिनी पण खूप हुशार होती. वडील आपल्यासाठी खूप कष्ट करतात याची जाणीव तिला होती. तिने खूप मेहनत घेऊन शिक्षण पूर्ण केलं. वडील मनोभावे महादेवाची पूजा करत. एक दिवस मोहिनी आणि बाबा नित्याप्रमाणे मंदिरात गेले.
महादेवाला नमस्कार करून जरावेळ मंदिरातच बसले. तोच मंदिराच्या एका कोपऱ्यातला एक भक्कम दरवाजा मोहिनीला दिसला. तिने बाबांना त्याविषयी विचारले, त्यावर बाबा म्हणाले - "पोरी गेली कित्येक वर्ष हा दरवाजा भक्कमपणे बंद आहे. काही लोक म्हणतात गुप्तधनाच्या हव्यासापोटी अनेक लोकांनी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला व ते प्राणाला मुकले." मोहिनीने मान डोलावली. मनात विचार केला जर खरच गुप्तधन असेल तर गावाची प्रगती होईल. अत्याधुनिक सोयी गावात येतील. गावात कॉलेज बांधता येईल. हा विचार तिने बाबांना बोलून दाखवला. बाबांनाही तो पटला आणि ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही या बोलीवर ते ही तयार झाले.
त्या रात्री मोहिनी व बाबा मंदिरात गेले. महादेवाचा आशीर्वाद घेतला व तो भक्कम दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्या दरवाजाच्या आत गेल्यावर दोघांचे डोळे दिपले. त्यांना खरंच गुप्तधन मिळाले होते. या धनाचा वापर गावाला आधुनिक बनवण्यासाठी करायचा होता. मात्र हे त्या नराधमाने पाहिले होते.
दुसऱ्या दिवशी ते तिघे नराधम मोहिनीच्या घरी गेले. बाबांना धमकावून त्या गुप्तधनातला बराचसा वाटा त्यांनी मागितला. मात्र त्या गुप्तधनाचा वापर गावाच्या विकासासाठीच व्हावा अशी बाबांची इच्छा होती. त्यामुळे बाबांनी तो वाटा देण्यास नकार दिला. यावर त्या नराधमांनी मोहिनीला उचलून नेले व वेशीवरच्या एका मोठ्या वाड्यातील माडीवरच्या एका खोलीत डांबून ठेवले.
माझ्या बाबांनी मला सोडविण्यासाठी पोलिसात तक्रार केली, मात्र पोलीस देखील त्या नराधमांना सामील होते. शेवटी बाबांनी त्या नराधमांना गुप्तधनाचा रस्ता सांगितला. त्या नराधमांनी अविरत परिश्रम केले तो दरवाजा उघडला गेला खरा.... पण....
© स्वर_अनुश्री
Very well written, really thrilling story. Waiting for further parts eagerly.
उत्तर द्याहटवाIt's getting more Interesting. Now waiting for next part 😍
उत्तर द्याहटवापण काय?????
उत्तर द्याहटवाWaiting for what happens next.
Interesting ,waiting for next part
उत्तर द्याहटवा