पुनर्जन्म - ४

पण त्यांना काहीही हाती लागले नाही. गुप्तधनाच्या हव्यासापोटी निष्काळजीने ते आत शिरले होते. त्यातल्या एकाला गंभीर दुखापत झाली. धन न मिळता उलट एकाला दुखापत झाल्यामुळे त्यांनी रागावून माझ्या बाबांच्या..." हुंदका आवरत मोहिनी पुढे म्हणाली- "बाबांच्या पाठीत सुरा खुपसून त्यांना मारले. पुढे ते माझ्याकडे आले व मला धनाचा रस्ता विचारू लागले. मात्र माझ्या सांगण्याने ही त्यांना धन मिळाले नाही. म्हणून त्यांनी याच खोलीत, याच खिडकीत मला फास लावला!"

ती एकदम सावरून व रागावून म्हणाली, "पोलिसांनी या केसची फाईल क्लोज करून टाकली. या प्रकरणाचा तपास झालाच नाही. पण आता मी आले आहे. मी याचा सोक्षमोक्ष लावणार. मला व बाबांना न्याय मिळालाच पाहिजे. गुप्त धनाचा वापर गावाच्या विकासासाठीच व्हायला पाहिजे." 

सर्वजण चकित होऊन मोहिनी ची कहाणी ऐकत होते सर्वांनी निर्धार केला व सर्व जण कामाला लागले. 

मिहीर, मिथिल आणि अक्षय पोलिस चौकीत जाऊन या केसच्या विषयी चौकशी करून आले, पण उलट पोलिसांनी ती फाईल कधीच क्लोज झाल्याचे सांगितले. त्यांनी पोलिसांना पुन्हा ती फाईल उघडायला सांगितले. नव्याने त्या प्रकरणाचा तपास सुरू झाला. 
ते तिघे नराधम त्या गावातच राहत होते. त्या प्रकरणाचा तपास सुरू झाल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. शेवटी त्या तिघांनी एक निर्णय घेतला.. 

त्यादिवशी अस्मि एकटीच महादेवाच्या मंदिरात गेली होती. त्यावेळी तिला गाठून त्या तिघांनी "या प्रकरणापासून दूर राहा नाहीतर आयुष्य संपेल" अशी धमकी दिली. मात्र त्यावर उलट- "मला व माझ्या बाबांना मी न्याय मिळवून देणार आहे. मला कोणाच्याही जीवाची पर्वा नाही." असे मोहिनीने उत्तर दिले व ती निघून गेली.

त्याच दिवशी रात्री ही सप्तर्षी मंदिरामागच्या नदीकाठी गेली होती. वरवर दाखवायला अस्मि एकटीच होती. 

त्या तिघांनी या संधीचा फायदा घ्यायचे ठरवले- अस्मि नदीकाठी बसली असता एकाने मागून जाऊन तिला नदीपात्रात ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात
मिहीरने त्याला पकडले व बाकी दोघांना पोलिसांनी अरेस्ट केली. शेवटी त्या नराधमांना शिक्षा झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेऊन सप्तर्षीने तो दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. अथक श्रमानंतर तो दरवाजा उघडला गेला. आत जाऊन सर्वांचेच डोळे दिपले. अखेरीस गुप्तधन मिळाले. 

त्यांनी त्या धनातून त्या गावासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा करविल्या. गावात चांगली शाळा-कॉलेजेस बांधली, प्लेग्राउंड बांधली. 

गुप्तधनाचा चांगला उपयोग झाला...

नराधमांना शिक्षा झाली... 

मोहिनी चा पुनर्जन्म सार्थ झाला.. आता उरली ती अस्मि. सप्तर्षीची अस्मि. या प्रकरणातून सप्तर्षीचाच जणू पुनर्जन्म झाला!!

© स्वर_अनुश्री

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रिय सखे - ३

प्रिय सखे - २

प्रिय सखे - १