स्पर्श
ती बसून होती तशीच.. तसा बराच वेळ झाला होता. बाहेर अंधारून आलं होतं. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. क्वचितच कधीतरी एखाद्या गाडीचा हॉर्न वाजत होता. एखादी सायकलही मधून मधून जात होती. खिडकीबाहेर बघण्याची तिची इच्छा नव्हती. घरातही तिचं फारसं मन लागत नव्हतं. काय करावं तिला कळत नव्हतं. विचारात मग्न असतानाच आवेगाने तिने रेकॉर्ड चालू केली... त्या सुरांनी अवघं वातावरण भारून गेलं. खरंतर ती तिची आवडती बंदिश होती. सहज काळजाला हात घालणारी.. मनाला भिडणारी -
पिया समजाऊ समझत नाही
साँस ननन्द मोरी देगी गारी
पायलिया झनकार मोरी
झनन झनन बाजे झनकार
समेवर येऊन बंदिश संपली. रेकॉर्ड सुद्धा सांगकाम्याप्रमाणे थिजली. पण.. पण ती मात्र.. ती मात्र डोळ्यात जमा होऊ पाहणाऱ्या अश्रूंना प्रयत्नपूर्वक थोपवत होती. मनालाच विचारत होती - का? हे सगळे भोग माझ्याच नशिबात का? मनाचाही बांध फुटला. डोळ्यात साठलेल्या अश्रूंना वाट करून देत ती ही मोकळी होऊ लागली. रडल्याने मन मोकळं होतं असं म्हणतात. मनात साठलेल्या सगळ्या भावनांना वाट करून दिली की मन कसं हलकं होतं. छे ! खोटं आहे हे.. उलट रडल्यामुळे त्याच भावनांची पुनःपुन्हा जाणीव होते. जखमेवर मीठ का काय ते म्हणतात ना अगदी तसं. तिच्या मनात द्वंद्व चाललं होतं. नाही. नाही.. नाही... मनातच या सर्व विचारांबद्दल प्रतिकाराच्या भावना निर्माण होत असतानाच आवेगाने तिचा हात केसातून फिरला. तशी तिच दचकली. भयभीत नजरेने वर बघते तो स्वतःचाच हात दिसल्याने थोडीशी सावरली. नजरेत तिच्या अंगार फुलत होते. आठवत होता तिला.. पुनः तोच स्पर्श.. नकोसा.. बळेबळेतोच केसातून फिरणारा. तीच विचित्र नजर आणि तोच एकेका बटेला स्पर्शून मोकळी करीत जाणारा हात.. नकोसा.. ती विचारांनीच दचकली. घाबरली. समोरच अस्ताव्यस्त पडलेला रबरबँड उचलला तिने. केस पूर्णपणे वर, अगदी घट्ट बांधून टाकले. कोणाच्याही हाताने सहजपणे सुटणार नाहीत एवढे घट्ट.. डोळ्यात एक भीती होती तिच्या. काही दिवसापूर्वीची स्वच्छंद, मोकळी, चंचल, तरल "रसिका" कुठेतरी हरवून गेली होती. ही ती नव्हतीच. ही भित्री आणि अबोल, एकटी रसिका होती. स्वतःशीच झगडणारी, घाबरून जगणारी. एकाच स्पर्शाची अनामिक भीती बसते ती अशी.
© - स्वर_अनुश्री
२२/०८/२०२०
Presentation and detailing are too good, though the story is really heart breaking. Keep writing keep growing.
उत्तर द्याहटवाKeep writing!!!
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंस .. keep writing ..
उत्तर द्याहटवाThe storyline is beautiful ❤️
उत्तर द्याहटवाAwesome story. Keep it up ana👍
उत्तर द्याहटवालेखनशैली सुंदर आहे. थोडा डिप्रेसिंग टोन असला तरी हरकत नाही. Keep trying...Good luck for next ... Awaited...:)
उत्तर द्याहटवासुंदर✨
उत्तर द्याहटवाSomething unique and beautiful story. Loved it. 😘
उत्तर द्याहटवाKhup sundar lihilayes....tu itka chhan lihilayes na ki te tine je anubhavla te sagla majhyasuddha dolyasamorun gela mhnje asa vatat hota ki te samor ghadtay kuthetri...wahhhh..amazinggg yaar♥️♥️🥰
उत्तर द्याहटवा