श्रीकृष्ण समजताना..
ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने |
प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ||
सौराष्ट्रातील एका प्राचीन आश्वत्थ वृक्षाच्या खाली पहुडलेला तो हरी, तो परमात्मा! या भूतलावरील सर्व क्लेशांचा नाश करून सर्वत्र सुख-शांती-प्रेम-आनंद जागृत करणाऱ्या अश्या या गोविंदाला माझा नमस्कार असो. खरंतर त्या श्रीकृष्णाचं वर्णन कशा आणि कोणत्या शब्दांत करायचं हा प्रश्नच आहे. शब्दातीत आहे त्या श्रीकृष्णाचं रूप, आणि त्याचं अस्तित्व! मधुराधिपतेरखिलं मधुरम् | अश्या या श्रीकृष्णाचं सर्व काही मधुरंच आहे!
तो जसा सर्वव्यापक आणि मोहक आहे त्याचप्रमाणे त्याचं नाव श्रीकृष्ण! ऐकायला अगदी गोड वाटतं, पण विचार करुन पाहिलं तर अंतर्मुख व्हायला लावतं. श्री या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातील सर्वमान्य असा अर्थ म्हणजे संपत्ती. पण त्याचबरोबर काही अर्थ असेही आहेत - श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे सामर्थ्य, श्री म्हणजे बुद्धिमत्ता, श्री म्हणजे गुणवत्ता, श्री म्हणजे अनंत, श्री म्हणजे अलौकिक! श्री या एका शब्दातून श्रीकृष्णतत्त्व लगेचच स्पष्ट होतं. प्रेम आणि सौंदर्याची परिभाषा म्हणजे श्रीकृष्ण! गुणवंत बुद्धीमंत असा राजस सुकुमार म्हणजे श्रीकृष्ण! अलौकिक अनंत असा हा परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण!
या संपूर्ण चराचरामध्ये तो श्रीकृष्ण भारून राहिला आहे. त्याला मोजायला असं वेगळं परिमाण नाहीच मुळी. संतश्रेष्ठ श्री अमृतेश्वर यांनी त्यांच्या एका अभंगात खूप सुंदर दृष्टांत दिला आहे.
तंतू पटी मिळाले भूमी नभापरी हो,
घट मृत्तीका निराळी ऐसे कसे म्हणावे?
जग व्यापका हरीला नाही कसे म्हणावे?
कपड्यामधून धागा वेगळा करता येत नाही, की घट आणि मृत्तिका म्हणजे माती वेगळे दाखवता येत नाही. मग जो परमात्मा आपल्या सर्वांचे पालनपोषण संगोपन करतोय त्याला आपल्यापासून वेगळं करून तरी कसं मोजणार? तो श्रीकृष्ण या चराचरातील प्रत्येक प्राणिमात्राच्या हृदयात प्रेम रूपाने, तत्व रूपाने, विचार रूपाने, अंशरूपाने वास्तव्य करतो आहे. तो मित्रांचा मित्र आहे! तो विचारवंतांचा विचारवंत आहे! तो सारथ्यांचा सारथी आहे! तो यादवांचा योद्धा आहे. वसूदेवाचा पुत्र वासुदेव आहे. श्रीकृष्ण ही सर्वार्थाने जीवन घडवणारी विभूती आहे! अशा या वासुदेवाला माझा नमस्कार असो.
श्रीकृष्णार्पणमस्तु!
Photo Credits - कौस्तुभ यादव
© - स्वर_अनुश्री
१९/०३/२०२१
Kup mast ❤ keep writing 👍
उत्तर द्याहटवा😍❤️
उत्तर द्याहटवाThe way you expressed"Shree" and Shree Krishna aavdlay!!!
उत्तर द्याहटवाओम नमो भगवते वासुदेवाय 🙏
उत्तर द्याहटवा👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाKhup khup sudndarrr😍😍😍❤️💕Manvedhakk
उत्तर द्याहटवाMsta🤘
उत्तर द्याहटवा