प्रिय सखे - १

    गर्द काळोख आणि धो धो पावसानी भरलेली रात्र होती ती. थंडी आणि बोचरं वारं अंगाला अगदीच त्रास देऊन जात होतं. कितीदा कूस बदलून अंगावरचं पांघरूण सारखं केलं तरीही झोप अशी काही लागतंच नव्हती. थंडीने अंग भरून आलं होतं अगदी. अशातच घडाम् ऽऽ कुठेतरी दूरवर वीज पडल्याचा आवाज आला आणि त्याचं मन धास्तावलं. का वाटत होती ही धास्ती ते काही माहित नाही पण... पण वाटत होती खरी. सारखी अनामिक हुरहूर दाटत होती. आणि तो मात्र रात्रभर कूस बदलतच राहिला…

    पहाटे कधीशी झोप लागल्यामुळे सकाळी त्याला लवकर उठवलंच गेलं नाही. साडेदहाच्या दरम्यान कधीतरी तो उठला आणि धावपळीतच आवरायला निघून गेला. कारण.. कारण अकरा वाजता त्याच्या नेक्स्ट फिल्म च्या शूटिंगचा शुभारंभ होता. आणि त्याला तिथे वेळेवर पोचणं अगदीच गरजेचं होत. आपणच लिहिलेल्या आपण जीव ओतलेल्या, आपण जिवंत केलेल्या पात्रांना पडद्‌यावर साकार होताना बघणं हा एका लेखकासाठी सोहळा असतो सोहळा... घाईघाईतच त्याने आवरलं. गर्द लाल रंगाचा मखमली कुर्ता घालून तो तयार झाला. Mild smell चा perfume त्याने मारला आणि वेगातच गाडीत जाऊन बसला.

    त्याच्या घरापासून अवघ्या वीसेक मिनिटांच्या अंतरावर त्याच्या फिल्म चा सेट होता. आज सेटवर शुभारंभ म्हणून एक छोटी पूजा केली होती आणि त्यानंतरंच शूटिंगला सुरुवात होणार होती. सगळेच कलाकार, तंत्रज्ञ, आणि निर्माते दिग्दर्शक अगदीच excited होते. आणि अर्थात तोही.

    तर तो.. म्हणजेच कौस्तुभ राजाध्यक्ष... चित्रपटसृष्टीतलं एक नावाजलेलं नाव.. पटकथाकार म्हणून अनेक वर्ष त्याचं नाव झळकत होत. कमी वेळात आणि कमी वयातच यश प्राप्त केल्या गेलेल्या अशा कलाकारांच्या यादीत नाव होतं त्याचं. एकापाठोपाठ एक सात ब्लॉकबस्टर फिल्मचा तो पटकथाकार होता, वेगवेगळ्या अनेक विषयांवर त्याने उठावदार चित्रपटांसाठी पटकथालेखन केलं होतं. त्यांचीच ही नेक्स्ट फिल्म... 'प्रिय सखे'. याच फिल्मच्या शूटिंगचा आज शुभारंभ होता. त्या फिल्म बद्दल कौस्तुभ जरा जास्तच हळवा होता. त्याच्या मनात या फिल्म ची जागा काहीतरी वेगळीच होती आणि म्हणूनच कदाचित तो जास्त नर्व्हस आणि excited सुद्धा होता.

    हाय कौस्तुभ कसा आहेस अचानकच  त्याच्या कानात आवाज आला आणि तंद्रीतून बाहेर येत त्याने त्या दिशेने पाहिलं. हे... हाय - ठिके मी तू? तो म्हणाला तशी ती व्यक्ती डोळ्यात आर्तता आणून त्याच्याकडे बघत होती पण त्याच्या नजरेत‌ला थंड भाव पाहून मात्र तिचे डोळे निराश झाले. आणि मोघम काहीतरी उत्तर देत ती निघून गेली. ती गेली त्या दिशेने बघत त्याने मात्र नाराजी व्यक्त केली. शूटिंग संपेपर्यंत आता रोजच हिचं तोंड बघावं लागणार म्हणून मात्र त्याची चिडचिड होत होती.

    रक्षीता.. रक्षीता देसाई तिच नाव. Actress होती ती. या फिल्मची सुद्धा ती Lead heroine होती. आणि... आणि कौस्तुभची एक्स गर्लफ्रेंड! ब्रेकअप नंतर जवळ जवळ अडीच तीन वर्षानी ते दोघंही एकमेकांसमोर आले होते. खरंतर त्याला त्याच्या फिल्म मध्ये तिला घ्यायचंच नव्हतं पण, बाकी काहीही असलं, तरी तिचं टॅलेंट मात्र वाखणण्यासारख होतं. त्या भूमिकेला ती आणि तीच न्याय देऊ शकते हे फॅक्ट Accept करून तिला साइन केलं होतं.

    शूटिंगला सुरुवात झाली. तो अगदी डोळ्यात प्राण आणून ते बघत होता. ही फिल्म त्याच्यासाठी खूप काहीतरी होती. आणि तशीच स्टारकास्ट, तोलामोलाचा दिग्दर्शक असल्यानी सगळेच जीव तोडून काम करायला तयार होते.

    तो अख्खा दिवस त्याने सेटवरच घालवला. त्यानेच घडवलेलं एकेक पात्र साकार होताना बघत होता तो. एकेका कलाकाराची Acting बघून त्याला आपल्या पात्राचं प्रतिबिंबच समोर दिसतं आहे की काय असं वाटू लागलं. आणि ते बघत असतानाच त्याला ती दिसली...

    त्याच्याच सेटवर होती ती. खूपच सुंदर दिसत होती. हातातल्या writing pad वर लावलेल्या कागदात बघून काही arrangements करण्यात, मध्येच कोणी काही संगितले तर ते नोट करण्यात एकदम बिझी होती. कानात झुमके आणि हातात त्या ऑक्सिडाईझ बांगड्यांची किणकिण करत ती काम करत होती. मधेच कधी कपाळावर बट आली तिच्या तर ती मागे ढकलताना तिच्या झुमक्यांची होणारी हालचाल बघून तो अजूनच जास्त विस्फारल्या डोळ्यांनी तिच्यकडे बघत होता.

    काही विचार त्याच्या डोक्यात चालू असतानाच अचानक हाक आली, "हे कौस्तुभ, कसं वाटतंय सगळं?'' आणि त्याने दचकून मागे बघीतलं तर कल्पेश म्हणजेच त्या फिल्मचा director त्याच मुलीसोबत तिथे उभा होता. “छान वाटतंय बघून" तो म्हणाला.

    ‘Meet my assistant, मिस. वीणा गाडगीळ" कल्पेश त्याची तिच्याशी ओळख करून देत म्हणाला. "आणि वीणा, हा कौस्तुभ, माहित असेलच तुला!’

    वीणाने कौस्तुभकडे पहात एक मंद स्मीत केलं. "हेलो सर" तिने त्याला ग्रीट केलं. 'हाय, होप यू आर गुड हियर" तो तिच्याकडे बघत म्हणाला "येस सर, Thanks' एवढं म्हणून गोड हसून ती तिथून निघून गेली आणि तो मात्र ती गेली त्या दिशेने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अवाक होऊन बघतच राहिला.

क्रमशः

स्वर _अनुश्री

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रिय सखे - ३

प्रिय सखे - २