पोस्ट्स

स्त्री

#latepost #nirbhaya #soudamini #asifa मुलगी म्हणजे धनाची पेटी.. म्हणायला खूप सोपंय पण आजच्या जगात याच लक्ष्मीला पायपुसणीसारखं वागवलं जातंय. आजच्या जगात वावरताना मृत्यूच्या भीतीपेक्षाही लोकांच्या नजरांची भीती वाटते. त्या नजरा सहन करण्यापेक्षा मृत्यू सोपा वाटतो. जवळचा वाटतो. खूपच उद्धटपणाचं आणि तडकाफडकी केलेलं वक्तव्य असेलही हे, अविचारी ही असेल पण तितकंच सत्य आहे.  अगदी २१-२२ वर्षाच्या मुलीपासून ते प्रौढ वयाच्या बाईपर्यंत कोणती स्त्री सुरक्षित आहे? खरंतर आता ५-६ वर्षाच्या मुलींची ही खूप काळजी वाटू लागली आहे.  भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे अनन्यसाधारण कर्तृत्व आहे. शुंभनिशुंभादिक राक्षसांचा नायनाट करणारी एक स्त्री होती. आपल्या पतीच्या कल्याणासाठी, सहवासासाठी सर्व भौतिक सुखांचा त्याग करून चौदा वर्ष वनवास भोगणारी एक स्त्री होती. कठोर अग्निपरीक्षेला सामोरी जाऊन त्यात सरस ठरणारी एक स्त्री होती. आपल्या पोटच्या बाळाला कमरेशी बांधून रणांगणावर उतरणारी एक स्त्री होती. राष्ट्रपती पदाची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे पेलणारी एक स्त्री आहे. क्रिकेट, बॉक्सिंग सारख्या खेळात प्राविण्य मिळवणारी स्त्र...

ज्वाला...

जशी जशी सूर्यास्ताची वेळ येत होती तशी तशी त्याची हुरहूर वाढत होती. नाही म्हणलं तरी दोन वर्षे उलटून गेली होती त्या घटनेला. तरी त्याच्या डोळ्या समोर सगळं स्पष्ट दिसत होतं. त...

स्वप्ननगरी

काॅलेज लाईफ.. प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारा काळ..नवीन काॅलेज, नवीन वातावरण, नवीन आयुष्य, नवीन मित्र, आणि प्रत्येकाच्या डोळ्यांत नवीन आशा..नवीन विश्वास.. पहिलं लेक्...

अनाहत

तुला पाहता आज असा मनातील का भाव कळे ओठावरल्या गीताला का आज नव्याने चाल मीळे गतजन्मीचे आपुले नाते ओढ त्याची आज कळे ओठावरल्या गीताला का आज नव्याने चाल मीळे दुःखसुखाचा खे...

तिची अधुरी कहाणी..

त्याला कळतंच नव्हतं..ती त्याच्यात किती गुंतत होती..त्याच्यापासून लांब जाताना..कुठेतरी आणखी जवळ येत होती..त्याच्याच नकळत त्यालाच पाहताना स्वतःच्या नकळत स्वतःला हरवून बस...

अंतरीचे गूज

स्वप्न पाहता आज नव्याने धुंद सुमने उमलून आली बावरलेल्या भेदरलेल्या शहारल्या मना तू मार भरारी मंद चांदणे मूक आसवे सुखदुःखाची गीते वारा गातो आज नव्याने मना तुझीच गीते ...

सख्या रे

श्रावणाच्या धुंद मासी डोळ्यामधुनी प्रीत तरारे हिरव्या हिरव्या मखमलीत मी वाट पाहते तुझी सख्या रे शब्द बोलके आज संपले मुक्या भावना दाटून येता तुझी प्रेमिका कशी आज का धु...