पोस्ट्स

श्रीकृष्ण समजताना...

इमेज
                 कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो                   लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः || मी संपूर्ण जगताचा क्षय घडवणारा काळ आहे. होय मीच काळ आहे. दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठीच मी येथे आलो आहे. असं भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणाले आहेत. हृदयाने हृदयाशी साधलेला संवाद म्हणजे हृद्गत. चराचरातील सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात निवास करणारा तो हरी, त्याच्याशी साधलेला संवाद म्हणजे हृद्गत. त्याच हृदयस्थ वासुदेवाची अनेक रूपे आहेत. त्यातूनच श्रीकृष्ण तत्त्व अधिक स्पष्ट होतं.  बालवयातच अनेक मोठ्या मोठ्या, क्रूर, दुष्ट राक्षसांचा संहार करणारा "लीलापुरुष" म्हणावा? सवंगडी व गोप एकत्र गोळा करून एकमेकांच्या खांद्यावर थर लावून, शिंकाळ्यातील दही, दुध, लोणी चोरणारा आणि तेच सर्व मित्रमंडळींमध्ये वाटून खाणारा "सात्विक नटखट चोर" म्हणावा? किशोरवयात रासक्रीडा करणारा तो "राजस सुकुमार" म्हणावा? नदीकाठी स्नानासाठी गेल्या असता गोपिकांची वस्त्रे पळवणारा "प्रणयी कुमार" म्हणावा? मानस भगिनी द्रौपदीला लज्जारक्षणास्तव...

श्रीकृष्ण समजताना..

इमेज
सद्हेतूने समष्टीच्या श्रेयसासाठी, कल्याणासाठी परमशक्तीला मनोगत आवाहन करून प्राशन केलेली जलांजली म्हणजे आचमन! शिवाजी सावंतांच्या युगंधर मध्येच वाचलंय मी हे. थोडक्यात काय तर हा लेख श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणून मी या लेखाचा शेवट करेनही. पण तरीही लेखाच्या सुरुवातीला आचमन करून श्रीकृष्णाला आवाहन करण्याचा मोह आवरला नाही इतकच. खरंतर बालबुद्धीला आणि बालमनाला बालपणापासूनच रुचतो, भावतो, आवडतो तो श्रीकृष्णच.. त्याच्या त्या मोहक, त्रासदायक तरीही मनाला भावणाऱ्या बाललीला कोणाला नाही आवडत? आपल्या बालपणीचा पहिला सवंगडी हा श्रीकृष्णच असतो नाही का? आपल्याला मोठ्यांकडून काही कथा तर आवर्जून सांगितल्या जातात.. त्याच कथा ऐकत ऐकत लहानाचे मोठे होतो नाही आपण? भर तारुण्यात आल्यावरही तो श्रीकृष्ण जवळचा वाटतो. का कुणास ठाऊक पण अगदी तारुण्यात असलेल्या मुलीच्या मनात दडलेला स्वप्नातला राजकुमार हा थेट जाऊन श्रीकृष्णाशी साधर्म्य साधतो. दूर कुठेतरी पाचूसारख्या वनांमध्ये अलगद बासरी वाजवत बसलेला तो राजस, सावळी काया असलेला श्रीकृष्ण कोणत्या मुलीच्या मनात भरणार नाही सांगा ना? मनाच्या गाभ्यावर अलगदपणे मोरपीस फिरावं तसं श्...

स्वप्न

 असाच आहेस तू,  खळखळून वाहणाऱ्या पाण्यासारखा  झुळझुळणाऱ्या नदीचा किनारा,  सळसळणाऱ्या पानांतला वारा,  धगधगणाऱ्या आगीची उब देतोस, कधी अंगावर सरसरणारा शहारा..  वाऱ्याच्या हिंदोळ्यावर झुलणारी पानं  लाल लाल गुलाबांनी बहरलेली रानं  रानाच्या त्या मधोमध उभं राहुनिया  माझ्यावर रोखलेले तुझे ते नयन  गुलाबांची लाली माझ्या गालावर चढते  तुझ्यामध्ये मी ही मग हिंदोळत जाते  मग येते एक हलकीशी झुळूक  सैरभैर होते मी ही अचानक  केस माझे उडती त्या वाऱ्यावर छान  पण ना उरते मला कशाचेच भान  नजरेत माझ्या एक तू आणि तूच दुजे काही आता या मनात भरेनाच हात तुझे पसरुनी तुही असतोस  डोळे मिटूनही मला एक तूच दिसतोस  एक एक पावलाने पुढे सरकत  मी ही मग येत जाते तुझ्याच समीप  आसुसले डोळे तुझे मला बघतात  एक एक क्षण असा जाय सरकत अचानक कसे काय कोणास ठाऊक  अंधुकले सारे काही दिसेना पुढ्यात  असतोस पण तू तसाच उभा तिथे  मी ही मग विश्वासाने चालत राहते  अवचित कशी माझी झोप मोड होते डोळ्यातले स्वप्न मग मिटुनीया जाते...

स्पर्श

ती बसून होती तशीच.. तसा बराच वेळ झाला होता. बाहेर अंधारून आलं होतं. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. क्वचितच कधीतरी एखाद्या गाडीचा हॉर्न वाजत होता. एखादी सायकलही मधून मधून जात होती. खिडकीबाहेर बघण्याची तिची इच्छा नव्हती. घरातही तिचं फारसं मन लागत नव्हतं. काय करावं तिला कळत नव्हतं. विचारात मग्न असतानाच आवेगाने तिने रेकॉर्ड चालू केली... त्या सुरांनी अवघं वातावरण भारून गेलं. खरंतर ती तिची आवडती बंदिश होती. सहज काळजाला हात घालणारी.. मनाला भिडणारी - पिया समजाऊ समझत नाही  साँस ननन्द मोरी देगी गारी पायलिया झनकार मोरी  झनन झनन बाजे झनकार  समेवर येऊन बंदिश संपली. रेकॉर्ड सुद्धा सांगकाम्याप्रमाणे थिजली. पण.. पण ती मात्र.. ती मात्र डोळ्यात जमा होऊ पाहणाऱ्या अश्रूंना प्रयत्नपूर्वक थोपवत होती. मनालाच विचारत होती - का? हे सगळे भोग माझ्याच नशिबात का? मनाचाही बांध फुटला. डोळ्यात साठलेल्या अश्रूंना वाट करून देत ती ही मोकळी होऊ लागली. रडल्याने मन मोकळं होतं असं म्हणतात. मनात साठलेल्या सगळ्या भावनांना वाट करून दिली की मन कसं हलकं होतं. छे ! खोटं आहे हे.. उलट रडल्यामुळे त्याच भावनांची पुनःपुन्ह...

अनाहत संगीत अकादमी

इमेज
नाती.. काही नाती असतातच अशी, जी अचानक जुळतात पण कायमची. एकमेकांच्या मनात असलेलं एकमेकांचं अस्तित्व, भरभरून असणारं प्रेम, ओथंबणारी माया, डोळ्यातली शीतलता, एकमेकांची काळजी यांनी ओतप्रोत भरलेली असतात अशी नाती. या नात्यांना खरंतर काहीच नाव नसतं. नाव देऊच शकत नाही मुळी.  मातापित्यानंतर ज्या नात्यांशी आपली ओळख होते.. गुरु-शिष्य, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण हीच ती नाती.. ह्या नात्यांशी ओळख झाली अनाहत संगीत अकादमी मुळे. खरंतर शाळेत होते मी तेव्हा. जराशी बुजरीच. कोणाशीच जास्त बोलायचे नाही. समोरच्या व्यक्तीशी पूर्णपणे ओळख होईपर्यंत मी गप्पच असायचे. अनाहत संगीत अकादमी मध्ये माझा प्रवेश झाला. प्रवेश प्रक्रिया झाली आणि माझा क्लासही सुरु झाला. (खरंतर इथे मला नोंद करायला अत्यंत आनंद होतोय की माझी बालपणीची मैत्रीण रक्षा पाठक हिच्या संपर्कामुळे आणि सहकार्यामुळेच माझा प्रवेश होऊ शकला.) संस्कृत मध्ये तात या शब्दाचा अर्थ वडील असा आहे. आमचे नावाने व अधिकाराने तात म्हणजे आमचे गुरुजी. अकादमी मध्ये गुरूंना म्हणजेच डॉ. रवींद्र घांगुर्डे गुरुजी यांना तात व डॉ. वंदना घांगुर्डे मॅडम यांना दीदी म्हणतात आणि तेही आप...

पांडुरंग कांती १ - "तोचि विठू महार"

माध्यान्हीची वेळ होती ती. उन्हं डोईवर आली होती. डोक्यावर सूर्य तेजाने तळपत होता. आणि अश्या तळपत्या दुपारी "ते" आपली स्नानसंध्या - पूजाअर्चा उरकून गाईला गोग्रास द्यायला गोठ्यात आले. त्यांचा नियमच होता तो. देवपूजा झाल्यावर गाईला गोग्रास द्यायचा. त्यानंतर कोणी आल्यागेल्या अतिथीची पूजा करायची. त्याला जेऊखाऊ घालायचं आणि मग स्वतः भोजन करायचे. आणि या दिनक्रमात जराही बदल होत नसे. आजही गोग्रास ठेवून माजघरात परतत असताना त्यांना समोरून एक जराजर्जर झालेला, भुकेने बेजार झालेला, हात पाय थकलेले तरीही कष्टी होऊन पुढे चालणारा, डोईवरचे केस पिकलेले आणि चेहेऱ्यावर सुरकुत्या आलेला एक वृद्ध गृहस्थ येताना दिसला. त्यांनी स्वतःहून पुढे होऊन त्या गृहस्थांची चौकशी केली. त्यांना समजलं, त्या गृहस्थांनी काही खाल्लं नव्हतं. त्यांचं हृदय कळवळलं. त्यांनी त्या गृहस्थांना आपल्या घरी नेलं. त्यांना जेऊ खाऊ घातलं. त्यांची समस्या दूर करायचा त्यांनी पूर्णपणे प्रयास केला.  सज्जनस्य हृदयं नवनीतं यद् वदन्ति कवयस्थ दलितं अन्यदेह विलसत् परितापात् सज्जनो द्रवती नो नवनीतं|| (अर्थ : सज्जनांचं हृदय हे लोण्यापेक्षाही मऊ असतं...

पुनर्जन्म - ४

पण त्यांना काहीही हाती लागले नाही. गुप्तधनाच्या हव्यासापोटी निष्काळजीने ते आत शिरले होते. त्यातल्या एकाला गंभीर दुखापत झाली. धन न मिळता उलट एकाला दुखापत झाल्यामुळे त्यांनी रागावून माझ्या बाबांच्या..." हुंदका आवरत मोहिनी पुढे म्हणाली- "बाबांच्या पाठीत सुरा खुपसून त्यांना मारले. पुढे ते माझ्याकडे आले व मला धनाचा रस्ता विचारू लागले. मात्र माझ्या सांगण्याने ही त्यांना धन मिळाले नाही. म्हणून त्यांनी याच खोलीत, याच खिडकीत मला फास लावला!" ती एकदम सावरून व रागावून म्हणाली, "पोलिसांनी या केसची फाईल क्लोज करून टाकली. या प्रकरणाचा तपास झालाच नाही. पण आता मी आले आहे. मी याचा सोक्षमोक्ष लावणार. मला व बाबांना न्याय मिळालाच पाहिजे. गुप्त धनाचा वापर गावाच्या विकासासाठीच व्हायला पाहिजे."  सर्वजण चकित होऊन मोहिनी ची कहाणी ऐकत होते सर्वांनी निर्धार केला व सर्व जण कामाला लागले.  मिहीर, मिथिल आणि अक्षय पोलिस चौकीत जाऊन या केसच्या विषयी चौकशी करून आले, पण उलट पोलिसांनी ती फाईल कधीच क्लोज झाल्याचे सांगितले. त्यांनी पोलिसांना पुन्हा ती फाईल उघडायला सांगितले. नव्याने त्या प्रकरणाचा तपा...

पुनर्जन्म - ३

पोहोचताच सर्वप्रथम त्या महादेवाच्या मंदिरात सर्वजण गेले. त्या मंदिराविषयी आजूबाजूला चौकशी केल्यावर कळलं ते सर्वात जुने, पौराणिक मंदिर आहे आणि सुमारे पन्नास वर्षांपूर्वी या गावातील पुजाऱ्याचा रहस्यमय मृत्यू झाला. सर्वांच्या डोक्यात खाडकन ट्यूब पेटली.  पुजाऱ्याचे प्रेत.... त्या पुजार्‍याला एक मुलगी होती. पण ती मुलगीही खूप वर्षांपासून बेपत्ता आहे. खाडकन दुसरी ट्यूब पेटली.  खिडकीत बसून रडणारी मुलगी - रिकामी खिडकी...... गावकऱ्यांना धन्यवाद करून सप्तर्षी एका शांत ठिकाणी आली. खिडकीत बसून रडणारी मुलगी, रिकामी खिडकी, पुजाऱ्याचे प्रेत, महादेवाचे मंदिर यांचा संबंध लागला. पण, पण तो पडका वाडा? आणि या सर्वांचा अस्मिशी काय संबंध?  "Guys I think आपण त्या वाड्यातच जाऊ मगच कळेल!" असं म्हणून अस्मि वेशीवरच्या पडक्या वाड्याच्या दिशेने निघाली.  त्या वाड्याच्या भोवती अनेक झाडं होती. त्या वाड्याची आणि त्या झाडांची काळजी घेतली असती तर कदाचित ती खूप सुंदर वास्तू ठरली असती. अचानक अस्मि ओरडली - "बघा, बघा ती रडतेय!" सर्वजण अचंबित होऊन अस्मिकडे बघू लागले. धावत, पळत अडखळतच अस्मि माडीवर आली. एकदम ...

पुनर्जन्म - २

इमेज
अस्मि, मृण्मयी, सानिका, रेश्मा, मिहीर, मिथील, अक्षय.. ही सप्तर्षी... मुंबईत धुडगूस घालणारी... मुंबईला सळो कि पळो करून सोडणारी...अचानक काळजीत पडली... अस्मिला पडणाऱ्या स्वप्नांमुळे... खरंतर त्या स्वप्नांत विशेष असं काहीच नव्हतं. पण का कुणास ठाऊक जरा विचित्र होतं. "एक मुलगी खिडकीत बसून रडतीये" असं स्वप्न पहिल्या रात्री पडलं. दुसऱ्या वेळी तीच खिडकी दिसली.. पण "रिकामी".... तिसऱ्या वेळी एक "पुजाऱ्याचे प्रेत"....काहीच कळेना. अस्मि तर विचार करून करून वेडी व्हायच्या बेतात होती. काय करायचं कुणालाच कळेना. शेवटी डोकेबाज मिथिलने आयडिया काढली. "आपण सगळे जण एका पिकनिकला जाऊ. जरा वातावरण बदललं की आपोआप अस्मिचा मानसिक ताण कमी होईल." ही आयडिया सर्वानुमते पास झाली. सर्वांनी मिथिलचे कौतुक केले. आणि लॉंग वीकेंड चा फायदा घेण्यासाठी ही सप्तर्षी दाखल झाली "पंचपर्णी" गावात.... गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार लागून सुट्टया होत्या खर्‍या पण शुक्रवारी "पंचपर्णी" गावात झालेल्या वादळामुळे हिरमूढ होऊन सर्वजण रात्रीपर्यंत मुंबईला परतले. रात्री, दमणूक झाल्य...

पुनर्जन्म - १

इमेज
"नाही! नाही!" हे काय चाललंय तिचं तिलाही कळत नव्हतं. काहीतरी आकस्मित, अकल्पित घडत होतं. अपरिचित घटना, अपरिचित व्यक्ति, अपरिचित ठिकाणे का कुणास ठाऊक, पण परिचित वाटत होती. आयुष्यात पहिल्यांदाच बघत असलेल्या महादेवाच्या मंदिरातील नंदी, समोर उभी असताना मंदिराच्या मागून वाहणार्‍या नदीचा खळखळाट तिला परिचित वाटत होता. या मंदिराच्या कोपऱ्या कोपऱ्यातून आपल्याला काहीतरी खुणावतय. या मंदिरात काहीतरी गूढ दडलंय. आपला त्याच्याशी कसला संबंध असेल? असा विचार करत असतानाच अचानक सुरू झालेल्या घंटानादामुळे ती दचकली.  "घण घण घण घण" अशा मोठ्या आवाजात होणाऱ्या घंटा नादामुळे या भागातील शांतता क्षणाक्षणाला भंग पावत होती. अचानक सोसाट्याचा वारा सुटला त्यासरशी तिथल्या झाडांची पाने गळून पडली. आकाश एकदम निरभ्र असताना अचानक एक काळा ढग दिसावा आणि काही क्षणात ते निरभ्र आकाश काळवंडले जाऊन धोधो पाऊस पडावा तसं काहीसं त्या परिसराचं झालं. अतिशय शांत असणाऱ्या त्या परिसरात अचानक घंटानाद सुरू झाला, सोसाट्याचा वारा आला आणि  चक्रच पालटलं. कसला संकेत असेल तो? काहीतरी अघटित घडणार हे मात्र नक्की! पण नक्की काय सूं स...